Aurangabad Cantt Board
औरंगाबाद छावनी परिषद

AURANGABAD CANTONMENT BOARD

swachh bharat

मुख्य कार्यकारी अधिकारी

admin-ajax.php
श्रीमती.आकाँक्षा तिवारी
 

मुख्य कार्यकारी अधिकारी हे सिव्हिल सर्व्हिसेसच्या इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस कॅडरचे अधिकारी आहेत आणि ते महानिदेशक रक्षा संपदा विभाग,  संरक्षण मंत्रालय,  भारत सरकार, यांच्या  प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करतात. सध्या श्रीमती. आकाँक्षा तिवारी,आईडीईएस,  मुख्य कार्यकारी अधिकारी  आहेत. 

मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कर्तव्ये खालीलप्रमाणे आहेतः

1] कलम २१ मधील उपकलम (१) च्या कलम (सी) आणि कलम (डी) च्या तरतुदींच्या अधीन, मुख्य कार्यकारी अधिकारी-

अ) सर्व अधिकारांचा वापर करणे आणि त्याच्यावर या अधिनियमाद्वारे किंवा त्याच्या अधीन असणारी सर्व कर्तव्ये पार पाडणे किंवा सध्या अस्तित्त्वात असलेल्या कोणत्याही अन्य कायद्याद्वारे कर्तव्ये पार पाडणे.

आ) या कायद्याद्वारे लागू केलेल्या कोणत्याही निर्बंध, मर्यादा आणि अटींच्या अधीन राहून, परिषदेचे प्रशासन या कायद्याच्या तरतुदीनुसार कार्यवाही होत आहे  याची खात्री करण्यासाठी कार्यकारी शक्तीचा वापर करणे.

इ) छावनी परिषेदेच्या  सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कृती व कार्यवाही यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे व त्यांचे कर्तव्य ठरविणे;

 ई) छावनी परिषेदेची  सर्व अभिलेखे  ताब्यात ठेवणे व त्यासाठी जबाबदार असने.

उ) या अधिनियमान्वये स्थापन झालेल्या कोणत्याही लवादाच्या,  समितीच्या,  परिषदेची कार्यवाहीशी संबंधित अशा जबाबदाऱ्या पार पाडने किंवा त्याची व्यवस्था करने, कारण त्या छावनी परिषेद त्याच्यावर अनुक्रमे लादू शकतात; 

ऊ) छावणीच्या प्रशासनाशी संबंधित कोणत्याही बाबतीची पुर्तता करने.